• Wed. Feb 5th, 2025

शहरात 19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट लीगला प्रारंभ

ByMirror

May 10, 2022

आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरूण जगताप, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांच्या पुढाकारातून 19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट लीगची सुरुवात मंगळवारपासून (दि.10 मे ) सुरु झाली. वाकोडी येथील साईदीप क्रिकेट अकॅडमी येथे या स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, संदीप घोडके, महाराष्ट्र पॅनलचे पंच (औरंगाबाद) अजय देशपांडे, गंगाधर शेवाळे, बनी मोडवे, गुण लेखक अजय कविटकर, जळगाव संघाचे प्रशिक्षक तन्वीर अहमद, प्रशिक्षक ऋषीकेश सुंबे, मिनीनाथ गाडीळकर, बबन गवळी आदींसह खेळाडू उपस्थित होते.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर खेळाडूंसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला आहे. अशा खेळाडूंना घडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आमदार अरुण जगताप यांनी नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ दिले आहे. शहरातील खेळाडू रणजी पर्यंत मजल मारत असून, क्रिकेट मध्ये मोठ्या शहरांची मक्तेदारी मोडीत निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.
19 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट लीग 23 मे पर्यंत चालणार आहे. अहमदनगरच्या ग्रुपमध्ये हिंगोली, धुळे, जळगाव, सीएम , ए पुणे, 22 पुणे, अहमदनगर अशी एकुण 6 संघ खेळणार आहे. यांचे सामने वाकोडी येथील साईदीप क्रिकेट अकादमी, निंबळकच्या गणपतराव गायकवाड या दोन मैदानावर होत आहे.

दोन दिवसीय सामने साखळी पध्दतीने रंगणार असून, यामधील दोन विजेते संघ सुपर लीगसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी गर्दी करत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुमतीलाल कोठारी, सचिव गणेश गोंडाळ, रोहित जैन, संदीप आडोळे, संजय वाल्हेकर, विनीत म्हस्के, योगेश म्हस्के, रितेश परमार, सागर खंडागळे, संदीप पलघडमल आदी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *