इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर(प्रतिनिधी)- भाईचारा व धार्मिक एकतेचा संदेश देण्यासाठी शहरात एक रोजा सबके साथ! हा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला. जुने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या इफ्तार कार्यक्रमात सर्व धर्मिय नागरिकांनी सहभाग नोंदवून धार्मिक व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शहर उपाध्यक्ष अब्दुल रऊफ खोकर यांच्या वतीने हा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, पीएसआय समाधान सोळंकी, सहा.पो.नि. मुजावर, मौलाना शफी कासमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मौलाना शफी कासमी रमजान, रोजा व जकातबद्दल मार्गदर्शन करताना म्हणाले की, रोजा म्हणजे अन्न-पाणी न घेता दिवसभर उपाशी राहणे नव्हे. रोजा हा वाईट गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याची आत्मशक्ती मनुष्यात निर्माण करतो. प्रत्येक रोजदार उपासना करताना वाईट बोलणे व वाईट कृत्यावर नियंत्रण मिळवत असतो. एका महिन्याची ही शिकवण वर्षभर अल्लाहासाठी चांगले काम करण्यास प्रेरणा देत असते. रमजानमध्ये प्रत्येकाने वर्षभर कमवलेल्या पैश्याचे अडीच टक्के हिस्सा रक्कम जकातच्या रुपाने गोरगरिबांना देणे अनिवार्य आहे. यातूनच सामाजिक, शांतता व प्रेमचा संदेश इस्लाम धर्म संदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्राम जगताप म्हणाले की, रमजान हा पवित्र महिना असून, शहरात इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. या वर्षीचा रमजान महिना उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वांना स्मरणात राहणार असून, तापमान 40 अंशाच्या पुढे जात असताना दुपारी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक अन्न-पाणी न घेता करत असलेले रोजे कौतुकास्पद गोष्ट आहे. या महिन्यात धर्मांचा विचार नवीन पिढीला देत असताना सामाजिक संस्कार रुजवण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पोलीस दलात अनेक मुस्लिम कर्मचारी रोजा करून प्रमाणिकपणे पोलीस बंदोबस्त ठेवतात. रमजान हा शांतता व प्रेमाचा प्रतिक असलेला सण असून सर्वांनी सामाजिक सलोख्याने साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या इफ्तारपार्टीसाठी तन्वीर शेख, सोहम गोन्साल्विस, अब्दुल्ला खोकर, रवी कुकडेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, कामगार सेलचे गजानन भांडवलकर, विशाल म्हस्के, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक रोहित आप्पा काटे, के.के. खान, विकार काझी, अब्दुलरहिम खोकर, किशोर पवार, शहेजाद खान, शैबाज शेख, हुसेन शेख, आबिद शेख, वसिम शेख, शाहनवाझ शेख, फरिद शेख, अॅड. तौसिफ बागवान, मौलाना कारी, हमिद टालेवाले, सचिन शेलार, साजिब शेख, यासर तांबटकर आदी उपस्थित होते. इफ्तार कार्यक्रमासाठी तोफखाना पोलिस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले.