• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या स्वप्नाली रोकडे हिचा गौरव

ByMirror

Apr 15, 2024

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रोकडे हिने मिळवले यश

ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -उषा सोनटक्के

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या स्वप्नाली रोकडे या युवतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल उषा अभ्यासिकेच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला.


उषा सोनटक्के यांनी रोकडे हिचा सत्कार केला. यावेळी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, विद्या बडवे, उत्कर्षा सोनटक्के, पद्माकर सोनटक्के, लविका सोनटक्के, उत्तम रोकडे, जयश्री रोकडे, प्रदिप कराळे, आशिष बेरड, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.


उषा सोनटक्के म्हणाल्या की, युवक-युवतींनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही. तर आलेल्या संकटावर मात करण्याचे बळ देखील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळत असते. स्वप्नाली रोकडे हिने मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


विद्या बडवे यांनी युवकांनी आपल्या क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल करावी. विविध स्पर्धा स्वत: मधील क्षमता सिध्द करण्याची संधी देत असतात, युवकांनी ध्येय प्राप्तीसाठी कठोर मेहनत व जिद्दीने यश गाठण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना स्वप्नाली रोकडे म्हणाल्या की, सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवली तर यश मिळते. ध्येय गाठत असताना उषा अभ्यासिकेचे मोठे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *