• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

किन्ही-बहिरोबावाडीतील प्रगतशील शेतकरी हरबरा पिकाच्या उत्पादनात अव्वल

ByMirror

Apr 15, 2024

कृषी विभागाच्या वतीने सन्मान

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- किन्ही-बहिरोबावाडी (ता. पारनेर) येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज शिवाजी देवराम खोडदे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत पारनेर तालुक्यातून हरबरा पिकासाठी प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.


खोडदे यांनी उत्कृष्ट पध्दतीने हरबराचे पिक घेऊन मिळवलेल्या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी (श्रीगोंदा) गणेश राठोड यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त तहसिलदार (श्रीगोंदा) गायत्री साईदाने उपस्थित होते. पिक घेण्यासाठी त्यांना कृषी सहाय्यक सौ. बोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले.


शिवाजी खोडदे गावात प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिध्द असून, त्यांना आधुनिक शेतीच्या कामासाठी मुलगा अभिजीत खोडदे यांचे सहकार्य मिळत आहे. खोडदे परिवार शेतात नवनवीन दिशादर्शक प्रकल्प राबवून पिक घेत असतात. तर इतर शेतकरी वर्गाला देखील मार्गदर्शन करतात. या यशाबद्दल ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *