• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

रिपाईच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जयाताई गायकवाड यांचा सत्कार

ByMirror

Apr 13, 2024

सामाजिक व राजकीय क्षेत्रात जयाताई गायकवाड यांचे कार्य सर्वसामान्यांना आधार देणारे -उषा सोनटक्के

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी जयाताई गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल उषा सोनटक्के यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, विद्या बडवे, उत्कर्षा सोनटक्के, पद्माकर सोनटक्के, लविका सोनटक्के आदी उपस्थित होत्या.


उषा सोनटक्के म्हणाल्या की, सामाजिक व राजकीय क्षेत्रात जयाताई गायकवाड यांचे कार्य सर्वसामान्यांना आधार देणारे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असून, त्यांची झालेली नियुक्ती ही सर्व महिलांच्या वतीने अभिमानास्पद आहे. त्यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अलकाताई मुंदडा यांनी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला वर्ग जयाताई गायकवाड यांना जोडला गेला आहे. नम्रता दादी-नानी ग्रुपच्या त्या अध्यक्षा असून, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व आरोग्यासाठी ते विविध उपक्रम राबवित असल्याचे स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना जयाताई गायकवाड यांनी कुटुंबात झालेल्या सत्काराने आनखी काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याची भावना व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *