न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने गौड हिचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मल्लखांब या स्पर्धेत न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील मल्लखांबपटू कु. गौरी गोपाल गौड हिने चमकदार कामगिरी करत कास्यपदक पटकाविले.
नुकतीच गुहाटी (आसाम) येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये देशातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मल्लखांब या स्पर्धेत गौड हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या वतीने गौड हिचा प्राचार्य डॉ.बी. एच. झावरे यांनी सत्कार केला. यावेळी प्रबंधक बबन साबळे, उपप्राचार्य बाळासाहेब सागडे, डी.आर. ठुबे, उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे आदी उपस्थित होते.
गौड हिने राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, संस्थेचे सर्व विश्वस्त, सदस्य, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रबंधक बबन साबळे, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. तिला स्पर्धेसाठी जिमखाना विभागाचे क्रीडा संचालक डॉ. शरद मगर, प्रा. धन्यकुमार हराळ, उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, आप्पा लाडाने, तुषार चौरे यांचे मार्गदर्शन लाभले.