• Mon. Jul 21st, 2025

राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

ByMirror

Feb 19, 2024

निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी सीआरएस नोंदणी करण्याचे खेळाडूंना आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीला बुधवारी (दि.21 फेब्रुवारी) भुईकोट किल्ला मैदान येथे प्रारंभ होणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे व विक्टर जोसेफ यांनी केले आहे.


3 मार्च पासून जळगाव येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ पाठवण्यासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होणार असून, 29 फेब्रुवारी पर्यंत निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.  या निवड चाचणीतून जिल्ह्याचा संघ निवडला जाणार असून, यामध्ये 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2012 दरम्यान जन्मलेल्या मुलींना सहभागी होता येणार आहे.


निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक असून, सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून जिल्ह्याचा संघ जाहीर केला जाणार असून, त्यांचे प्रशिक्षण घेऊन संघ जळगावच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पाठविला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *