महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सलग चौथ्यांदा पटकाविले सुवर्णपदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय मास्टर्स गेम्स वेटलिफ्टींग स्पर्धेत न्यू आर्टस् , कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील प्रा. डॉ. शरद बाळासाहेब मगर यांची सुवर्णपदकास गवसणी घातली. मगर यांनी महाविद्यालयातील खेळाडूंना वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करत असतानाच स्वतः देखील वेटलिफ्टिंग मास्टर्स गेम्स स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहे.
गोवा येथील मनोहर परीकर क्रीडा संकुलात सहावी राष्ट्रीय मास्टर्स गेम्स क्रीडा स्पर्धा 2024 उत्साहात पार पडली. यामध्ये भारतातील विविध राज्यातून खेळाडू सहभागी झाले होते. प्रा. डॉ. मगर यांनी सदर स्पर्धेत वेटलिफ्टींग या खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत त्यांनी 50+ वयोगटात 73 किलो वजन गटात सुवर्णपदकाची कामगिरी केली.

यापूर्वी त्यांनी बडोदा, तिरुणानंतपुरम, वाराणसी येथे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. यावर्षी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत सलग चौथ्यांदा त्यांनी सुवर्णपदक पटकावले. यावेळी वेटलिफ्टींग असोसिएशनचे साळवी यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक देवून सन्मानीत करण्यात आले. या स्पर्धेत केरळ, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यातील 200 हून अधिक खेळाडूनी सहभाग घेतला होता.
प्रा. डॉ. शरद मगर हे नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाईचे रहिवासी असून, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री संत एकनाथ इंग्लिश विद्यालय जेऊर व महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात झाले आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पुणे, औरंगाबाद व नांदेड येथे झाले त्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना 3 वर्ष सलग विद्यापीठ खेळाडू होते. त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी खेळाडूंना संघटित करून खेळाविषयी जनजागृती करुन अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले आहे. तर शारीरिक शिक्षण या विषयात त्यांनी पीएचडी मिळवून, शारीरिक शिक्षण या विषयात वेट ट्रेनिंग यावर 2 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांनी पंधरा पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रकाशित केले अहेत.

या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे, खाजिनदार डॉ. विवेक भापकर, जेष्ठ विश्वस्त नंदकुमार झावरे, सीताराम खिलारी, ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, इंजि. मुकेश दादा मुळे, जयंत वाघ, संस्थेचे विश्वस्त सदस्य, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. संजय कळमकर, डॉ. दिलीप ठुबे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रबंधक बबन साबळे, अधीक्षक, हेमा कदम, राजू पाटील, जिमखाना विभागातील प्रा. धन्याकुमार हराळ, प्रा. धनंजय लाटे, प्रा. सुधाकर सुंबे, प्रा. आकाश नढे, तुषार चौरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
