वनश्री लष्करे, श्रीनिवास शिंदे, थाणोजसाईरेड्डी किसरा, विराज पिसाळ व रुद्र आहेर यांनी पटकाविले पदक
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत शहरातील खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई केली. इंडिया तायक्वांदो व वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशनच्या मान्यतेने सवाई माधवराव स्टेडियम जयपुर (राजस्थान) येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करुन देशात अव्वल ठरले.
या स्पर्धेत वनश्री लष्करे याने रौप्य, श्रीनिवास शिंदे, थाणोजसाईरेड्डी किसरा व विराज पिसाळ यांनी कास्य पदक पटकाविले. तर पूमसे ज्यूनिअर मध्ये रुद्र आहेर यांनी कास्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत सोहम काळे, आर्यन आंग्रे यांनी चांगले प्रदर्शन केले.
सर्व गुणवंत खेळाडूंचे एकलव्य तायक्वांदो अकॅडमी व स्पोर्टस तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, सचिव घनश्याम सानप, एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपदादा सातपुते, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे सी.ई.ओ. गफ्फार पठाण, अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओम्बासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, टेक्निकल डायरेक्टर तुषार आवटे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अल्ताफ खान, गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर, तेजस ढोबळे, सचिन कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले.