युवा पीढीने उर्दू साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज -अकबरभाई (बम्बईवाले)
अहमदनगर (प्रतिनिधी)- उर्दू साहित्य व उर्दू भाषेसाठी कार्य करणाऱ्या जुन्या काळातील लोक राहिलेले आहे, तेच थोडे फार काम करत आहे. पण हा वारसा पुढे ही चालावा यासाठी युवा पिढीने उर्दू साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अकबरभाई (बम्बईवाले) यांनी केले.
मखदुम सोसायटी व इदारा अदबे इस्लामीच्या वतीने जुन्या काळातील अहमदनगर येथील उर्दू कवी व साहित्यकार हिम्मत अमीर अहमदनगरी यांच्या 57 वी स्मृतीदिनानिमित्त एका शाम हिम्मत अहमदनगरी के नाम व्दारे ऑल इंडिया मुशायऱ्याचे रहमत सुलतान हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उर्दू साहित्यिक व चाँद सुलताना हायस्कुलचे माजी प्राचार्य सैय्यद सैफ अली होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, अकबरभाई (बम्बईवाले), समाजवादी पार्टीचे स्टेट जनरल सेक्रेट्री डॉ. अ.रऊफ शेख, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार, माजी प्राचार्य अब्दुलकादिर, दादुभाई सुभेदार, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष आबीद हुसेन, सईद खान, कमरुद्दीन भाई, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सदस्य निसार बागवान, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, समीर सय्यद (नाशिक), रहीम खान नवाज खान, जहीर सय्यद, सय्यद आरिफ भाई, सलीम छोटू मियाँ जहागीरदार आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अकबर भाई म्हणाले की, आज अहमदनगर येथे जुन्या काळातील उर्दू साहित्यकांना लोक विसरले आहे. अश्या वेळी आमीर आर्टस् व मखदुम सोसायटीने एक जुन्या दिवंगत सुफी कवीचे स्मरण ठेवणे ही एक नव्या युगाची सुरुवात आहे. हे कार्य सतत पुढे सुरु राहण्याची अत्यंत आवश्यकता असून, नवीन पिढीला जुन्या इतिहासाबरोबरच तंत्रज्ञानाच्या युगात उर्दू साहित्यिक फार मागे पडले आहेत; हा साहित्यीक मागासलेपणा युवा पिढीने पुढाकार घेऊन संपवला पाहिजे, असे ते म्हणाले.
मुशायराऱ्यामध्ये हिम्मत अहमदनगरीच्या आठवणींना उजाळा देतांना खतीब तहुरा यांनी हिम्मत अहमदनगरीची नातीया शायरी..
ऐ! काश मदीने में दम मेरा निकल जाए..
दुनिया भी संभल जाए उकबा भी संभल जाए…..
हिम्मत के सुखन में तु या रब वो असर दे दें
पत्थर का अगर दिल हो सुनते ही पिघल जाए….
व तसेच कारी अनवार अहमद आणि नदीम रजा यांनी हिम्मत अहमदनगरीच्या अनेक सुफी रचना सादर केले. हिम्मत अहमदनगरीचे नातू मुनव्वर हुसैन यांनी हिम्मत अहमदनगरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी नगर जिल्ह्यासह देशभरातून आलेल्या शायर मध्ये अख्तर इलाहाबादी (इलाहाबाद), यासर आजमी (यु.पी.), अख्तर बेबाक (गुलशनाबाद), इरशाद वसीम (नाशिक), डॉ. कमर सुरुर, बिलाल अहमदनगरी, अर्क अहमदनगरी, सैय्यद खलील, आसिफ सर, मुनव्वर हुसेन, सुलेमान अहमदनगरी आदी कविंनी मुशाऱ्यामध्ये रंगत भरली. वाह ऽ.. वाह.., बहोत खूब… क्या कहने… मुकुर्रर… इरशादच्या गजरात मुशायरा रात्री 2 वाजता संपला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आबीद खान यांनी तर सूत्रसंचालन मुनव्वर हुसेन यांनी केले. आभार आमीर खान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.के. खान, छोटेखान हिम्मतखान उर्फ मन्जूर पेंटर व मजहर खान यांनी परिश्रम घेतले.