• Sun. Jul 20th, 2025

वरिष्ठ ग्रीको रोमन व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धा जिल्हा निवड चाचणी उत्साहात

ByMirror

Feb 2, 2024

निमगाव वाघात रंगला कुस्त्यांचा थरार; जिल्हा संघाची निवड

खेळाला शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे -प्रल्हाद गिते

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. न्यू मिलन मंगल कार्यालय येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचा थरार रंगला होता.


नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या हस्ते कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा तालिम सेवा संघाचे खजिनदार तथा नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सचिव पै. बाळू भापकर, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख, पै. गुलाब केदार, कुस्तीपटू पै. अनिल ब्राम्हणे, पै. अभिमन्यू फुले, पै. मनोहर कर्डिले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे फेब्रुवारीत वारजे पुणे येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या मान्यतेने नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी मल्ल पुणे येथील कुस्ती स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.


पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते म्हणाले की, खेळाला शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे. खेळाबरोबर शिक्षण देखील महत्त्वाचे असून, शिक्षण पूर्ण करुन खेळातून करिअर घडविता येते. कुस्तीमध्ये पुढे जाण्यासाठी मातीबरोबर मॅटवर देखील नवीन मल्लांनी सराव करण्याचे त्यांनी आवाहन केले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, दिग्गज मल्लांचा वारसा नगर जिल्ह्याला लाभला असून, अनेक नवीन मल्ल कुस्ती क्षेत्रात पुढे येत आहे. जिल्हा तालिम संघ व नगर तालुका तालिम संघाच्या माध्यमातून मल्लांना योग्य मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच पै. गणेश जाधव, मेजर निलेश मदने, मच्छिंद्र उचाळे यांनी काम पाहिले. विजयी मल्लांचे जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
सब ज्युनिअर- पृथ्वी गंगाधर जाधव (45 किलो), शुभम अण्णा पिसाळ (48 किलो), संकेत सुभाष फुलमाळी (51 किलो), सुरज सोमनाथ जाधव (55 किलो), सत्यम संदीप जाधव (60 किलो), उत्कर्ष राजेंद्र कर्डिले (65 किलो), सुशांत देवदान कांबळे (71 किलो), आदित्य बाळासाहेब लबडे (80 किलो), पृथ्वीराज संजय सुखदान (92 किलो), मोहित विठ्ठल मस्के (110 किलो).
वरिष्ठ ग्रीको रोमन- ओंकार अशोक रोडगे (55 किलो), ओंकार रावसाहेब खरमाळे (63 किलो), योगेश रमेश चंदेल (67 किलो), शंकर राजेंद्रे धांडे (72 किलो), कुमार किशोर देशमाने (77 किलो), पवन रमेश रोहकले (82 किलो), सचिन बबन साठे (87 किलो), विजय भागवत जाधव (97 किलो), युवराज ज्ञानदेव कर्डिले (130 किलो),

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *