पक्षाच्या शाखेचे उद्घाटन
शेवगाव तालुकाध्यक्षपदी अंकुश कोल्हे व महिला तालुकाध्यक्षपदी वंदना दळवी यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या शाखेचे शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी व मजले शहर येथे उद्घाटन करण्यात आले. तर शेवगाव तालुका अध्यक्षपदी अंकुश कोल्हे व महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी वंदना दळवी यांची नियुक्ती करुन तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या हस्ते शाखेचा उद्घाटन झाला. यावेळी पक्षाचे रिपाई महिला आघाडीच्य शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, शहर जिल्हा कार्याध्यक्ष दानिश शेख, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, पूजा साठे, सोनाली पवार, मंगल चांदणे, सविता पाटोळे, संगीता पाटोळे, अनु साळवे, अमृता पवार, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, युवकचे राहुरी तालुकाध्यक्ष लखन सरोदे, युवक शहराध्यक्ष अमोल खरात, अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, अजीम खान, मुन्ना भिंगारदिवे, अमित गायकवाड, दीपक गायकवाड, अतुल काळखेर, उमेश गायकवाड, आकाश भालेराव, चिकू गायकवाड, माया नरवडे, मंगल भालके, विमल दळवी, रंजना वंजारे, शशिकला कनगरे, शोभा दळवी, शीतल दळवी आदींसह गावातील ग्रामस्थ, रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशांत म्हस्के म्हणाले की, समाजात राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे. निवडणुका जवळ आल्याने जातीयवाद उफाळून येत आहे. जिल्ह्यात मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील महिला, युवक असुरक्षित असून, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहे. जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष सुरु असून, भावनिक मुद्दयांवर युवकांचे विचार भरकटविण्याचे काम सुरु आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने रिपाई सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्योतीताई पवार यांनी महिलांना रिपाईमध्ये सन्मानाची वागणुक देऊन महिलांच्या प्रश्नावर कार्य सुरु आहे. अन्यायाला वाचा फोडून वंचित, पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाई कटिबध्द असून, महिलांनी अन्याय सहन न करता त्या विरोधात आवाज उठविण्याचे सांगितले.
या कार्यक्रमात शेवगाव तालुका उपाध्यक्षपदी राहुल कोल्हे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी प्रभावती खंडागळे, सचिवपदी मनीषा नरवडे, खजिनदारपदी शाहूबाई गायकवाड यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाखा अध्यक्ष साहेबराव चव्हाण, शाखा उपाध्यक्ष राजेंद्र मिसाळ, सचिव विश्वास कोल्हे, राहुल फुलारे, खजिनदार संजय जगधने, राहुल कानडे, मार्गदर्शक अण्णा पवार, अनिल कोल्हे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, दीपक चव्हाण, संघटक दीपक पंडित, नंदकुमार कोल्हे, सुमन दिशागण, संगीता गायकवाड, मैना गायकवाड, अर्चना गायकवाड, अनिता नरवडे, संध्या दळवी, प्रियंका दळवी, प्रिया दळवी, योहान कोल्हे, समीर कोल्हे, मानयल कोल्हे, लाजरस कोल्हे, सुभाष कोल्हे, उत्तम कोल्हे, संदीप कोल्हे, संतोष कोल्हे, रमेश कोल्हे, रोहित कोल्हे, संभाजी कोल्हे, उत्तम चव्हाण, सरपंच अनिल मडके, उपसरपंच राजू खंडागळे, सचिन पंडित, पंकज पंडित आदी उपस्थित होते.