क्रीडा मेळावा उत्साहात
खेळाने अपयश पचविण्याचे व संयमाने पुढे जाण्याचे गुण विकसीत होतात -छायाताई फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी स्पर्धेचा थरार रंगला होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन घडविले.
संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया व खजिनदार प्रकाश गांधी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन क्रीडा मेळाव्याचे प्रारंभ झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, विभाग प्रमुख रेखा शर्मा, वैशाली वाघ, क्रीडा शिक्षक प्रितम जाधव, आकाश थोरात, हेड बॉय रोहन अडसरे, हेड गर्ल सिध्दी मते आदींसह सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, जीवनात मैदानी खेळ आनंद निर्माण करतो. तर खेळाने अपयश पचविण्याचे व संयमाने पुढे जाण्याचे गुण विकसीत होतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस मैदानी खेळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच खेळाकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रभाकर भाबड म्हणाले की, क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या मैदानावर गोला फेक, थाळी फेक, लांब उडी, 100, 200 मीटर धावणे, चेंडू फेक, 400 बाय 100 मीटर रिले या स्पर्धा रंगल्या होत्या. मैदानावर विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांचे अटीतटीचे थरारक क्षण अनुभवले. तर मैदानी खेळाचा आनंद लुटला.
धावणे स्पर्धेचे विशाल गोहेर, विद्या यादम, शैलेश राशीनकर, सुजित लांडे, लांब उडी स्पर्धेचे आसिफ शेख, संदीप गोरे, गोळा फेक स्पर्धेचे मनिष कांबळे, वैदेही गायकवाड, थाळी फेकचे रुबिना शेख, रविंद्र उजागरे यांनी परीक्षण केले. प्रमुख पंच म्हणून प्रितम जाधव व आकाश थोरात यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले.