दिंडी प्रदक्षिणा मिरवणुकीत आबालवृध्दांसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. गावातून भव्य दिंडी प्रदक्षिणा मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये प्रभू श्रीरामच्या वेशभुषेत बालगोपाळ सहभागी झाले होते. तर या दिंडी प्रदक्षिणामध्ये महिला डोक्यावर तुलसी कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

ह.भ.प. विवेकानंद महाराज शास्त्री (श्री क्षेत्र भगवानगड) यांच्या काल्याचे किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. दहिवाळ सराफ खरवंडीकर परिवाराच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयोजक तथा निमंत्रक नवनाथभाऊ दहिवाळ, नितीन दहिवाळ, सचिन दहिवाळ, अरुणा दहिवाळ, शितल दहिवाळ, पूजा दहिवाळ, बाळासाहेब गोल्हार, प्रविण दहिवाळ, संदीप फुंदे, विशाल फुंदे, निलेश फुंदे, प्रकाश कटारिया, आसाराम पाथरकर, विजय दहिवाळ, अमोल दहिवाळ, विष्णू आंधळे, संतोषी भिसे, बंडू भिसे, राम डहाळे, शुभम टाक, अनीवक भलगावकर, नारायणकर, माळेगाव भजनी मंडळ, किर्तनवाडी भजनी मंडळ, मुंगसवाडी भजनी मंडळ, भगवानगड परिसर भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्यानिमित्त पहाटे काकड आरती, सकाळी गाथा भजन, रामायण, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रंगला होता. यामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण ह.भ.प. बाबासाहेब महाराज खेडकर व रामायणाचे निरूपण ह.भ.प. संतोषनंद महाराज यांनी केले. या धार्मिक सोहळ्यात ह.भ.प. हरी महाराज राऊत (मिडसांगवी), ह.भ.प. संतोषानंद महाराज भारती (मुंगूसवाडे), ह.भ.प. जनार्दन महाराज माळवदे (अहमदनगर), ह.भ.प. बबन महाराज राठोड (दुर्गाशक्ती तांडा) यांचे प्रवचन झाले. तर ह.भ.प. मौनानंदजी महाराज (परभणी), ह.भ.प. जगन्नाथ महाराज शास्त्री (कोरेगाव) यांचे कीर्तन झाले. दहिवाळ सराफच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.