उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई
खेळाडूवृत्ती अंगीकारणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो -शकील शेख (पोलीस उपनिरीक्षक)
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत आयडियल वाडिया पार्क ग्रूपच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन पदकांची कमाई केली. यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये सत्कार करण्यात आला.
खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षक धर्मनाथ घोरपडे, मार्गदर्शक घनश्याम सानप, अहमदनगर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काजळे, सहकारी प्रशांत पालवे, आशिष ताकटे, अहमदनगर बॉक्सिंग संघटनेचे पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, योगिता गावडे, युथ कराटे फेडरेशनचे साबिल सय्यद, साहिल सय्यद, नंदिनी लखापती, मनीषा हुंडेकरी, पूजा वाघ, सीमा जाधव, दत्ता वाघ, अतुल वाघ, दिनेश नावरे, प्रमोद बोडखे, कैलास झुंगे, योगेश झुंगे, ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते.
इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशीप स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यामध्ये आयडियलचे खेळाडू शिवराज जाधव, उदय बोडखे, रोशन नावरे, श्रेयांश वाघ, अर्णव गावडे, खुशी नावरे, युगंधरा जाधव यांनी सुवर्णपदक पटकाविले. तर नील लखापती, काव्या हुंडेकरी, अक्षरा वाणे, नक्षत्रा नक्का यांनी रौप्य पदकाची कमाई केली. साई झुंगे, अथर्व झुंगे, शिव झुंगे, देवांश वाघ, आर्यन जाधव, कौस्तुभ बोडखे यांनी कास्यपदक मिळवले. या स्पर्धेत सुनिष्ठा भोसले, सक्षम भंडारी यांनी उत्कृष्ट खेळ केला.
शकील शेख म्हणाले की, खेळाडू हे देशाचे उज्वल भविष्य आहे. प्रत्येक घरात एक खेळाडू निर्माण होणे गरजेचे आहे. विशेष मुलींनी खेळाकडे वळणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनी त्यांना वेळ व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खेळाडूवृत्ती अंगीकारणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असतो व त्याचा सर्वांगीन विकास खेळाने साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.