दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड
विद्यालयाच्या समुद्रमंथन समूहनृत्याला प्रथम क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद अहमदनगर व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र विळदघाट यांचे संयुक्त विद्यमाने विखे पाटील फाउंडेशन विळद घाट येथे दिव्यांगांसाठीचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विद्यालयाचे विद्यार्थी विविध क्रीडाप्रकारात यशस्वी झाले. 100 मीटर धावणे सुजीत देवराम कदम, 200 मीटर धावणे प्रतीक भाऊसाहेब तोरवे, कुमार गटात 200 मीटर धावणे अमोल राजेंद्र बढे, शीतल पोपट आंधळे, 400 मीटर धावणे जुबेर मोहम्मद शेख, गोळाफेक सिद्धांत साईनाथ दुधाले, जलतरण स्पर्धेत अमोल राजेंद्र बढे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
तसेच दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत जानकीबाई आपटे मूक बधीर विद्यालयाने समुद्रमंथन हे समूहनृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. या सांस्कृतिक कार्यक्रमात आदिती पालवे, मिताली धुत, प्रिया सिंग, समीक्षा गांधी, सिद्धी रायकर, नेहा मोरे, वैष्णवी जपकर, ऋतुजा शेडगे, अक्षदा कचरे, अराफत शेख, सौरभ यादव, मनीष गांधी, प्रेम पवार, सिद्धांत दुधाले, ऋषिकेश सांगळे, मंगेश देवढे, ओम आवारी, ऋषिकेश जाधव, सुमीत खाडे, ओंकार मिठे, आदेश पवार, अनुराधा ताठे, राणी गरड, श्रद्धा गुडा या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या सर्व विजेत्या स्पर्धकांचे व कलाकारांचे धनश्री सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रसंगी स्पेशल ऑलिंपिकस भारत (महाराष्ट्र) अध्यक्ष डॉ. मेघनाजी सोमय्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, सहाय्यक सल्लागार दिनकर नाठे, डॉ. अभिजीत दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विजय आरोटे, सुदाम चौधरी, शिवानंद भांगरे, सहदेव करपे, संजय राठोड, पूनम गायकवाड, बाबासाहेब झावरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, सचिव डॉ. ओजस जोशी, खजिनदार राजस जोशी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.