• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

त्रिदल सैनिक संघटनेच्या पिंपळगव्हाण येथील शाखेचे उद्घाटन

ByMirror

Dec 30, 2023

आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्रिदलचा पुढाकार

खऱ्या अर्थाने सैनिक व शेतकरी हे देशाचे महत्त्वाचे घटक -गोवर्धन गर्जे

अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिक, वीर माता-पिता, पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या त्रिदल सैनिक संघटनेच्या पिंपळगव्हाण (ता. पाथर्डी) येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्रिदल सैनिक संघटना शाखेच्या फलकाचे अनावरण सेवारत सैनिक नामदेव घुले यांच्या हस्ते झाले.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जांभळी गट प्रमुख म्हातारदेव आव्हाड, कोरडगाव गट प्रमुख भानुदास केदार, अशोक घुगे, नामदेव घुले, पाथर्डी तालुकाध्यक्ष गोवर्धन गर्जे, पिंपळगव्हाण मधील सैनिक अण्णासाहेब थोरे, सोपान पाखरे, मधुकर पाखरे, गोवर्धन गर्जे, दादासाहेब पाखरे, महादेव पाखरे, राहुल पाखरे, गणेश थोरे, प्रशांत थोरे, बळीराम पाखरे, कल्याण पाखरे, संदीप पाखरे, संदीप थोरे, कृष्णा पाखरे, नवनाथ पाखरे, प्रदीप थोरे, जगदिश थोरे, बाबासाहेब पालवे, किरण पाखरे, दत्तात्रय पाखरे, कल्याण पाखरे, शिवाजी ढाकणे आदींसह गावातील आजी-माजी सैनिक व त्यांचे परिवारासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गोवर्धन गर्जे म्हणाले की, खऱ्या अर्थाने सैनिक व शेतकरी हे देशाचे महत्त्वाचे घटक आहे. सैनिक देशाचे रक्षण करतो, तर शेतकरी सर्वांचे पोट भरतो. सर्वाधिक शेतकऱ्यांची मुले सैन्यात आहेत. त्यामुळेच जय जवान जय किसान! हा नारा दिला जातो. आज सैनिकांचे प्रश्‍न गंभीर बनत चालले असून, त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन तालुक्यात इतर गावात देखील संघटनेच्या शाखा सुरु होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.


म्हातारदेव आव्हाड म्हणाले की, सैनिक संघटना आजी-माजी सैनिकांसह शेतकरी वर्गाच्या प्रश्‍नासाठी देखील संघर्ष करत आहे. संघटनेच्या माध्यमातून सैनिक कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सुरु आहे. आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी निस्वार्थपणे त्रिदल सैनिक संघटना सेवा देत असल्याचे ते म्हणाले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *