इसळक-निंबळकच्या गो शाळेस चारा वाटप
युवकांना दिशा देऊन समाजकार्य सुरु -दिलदारसिंग बीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या (ट्रस्ट) वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेऊन इसळक-निंबळक येथील गो शाळेस चारा वाटप करण्यात आले.
जनकल्याण रक्तपेढी येथे बीर यांनी रक्तदान करुन शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी अजय दराडे, किरण डफळ, जय लोटके, वरुन मिस्कीन, सुरज गोंधळी, जस्मितसिंग, प्रथमसिंग, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंत झेंडे, डॉ. विलास मढीकर, मार्गदर्शक अजय बोरा, सुरेश म्याना, संजय कांबळे, दत्ताभाऊ बेत्ती, मनिष नराल, रामदास शेरकर, सचिन नराल, महेश सब्बन, सुजित म्याना, हरिष बल्लाळ, प्रकाश जोशी, अमोल डफळ, विनायक गोसके, गणेश चिटमील आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच इसळक-निंबळकच्या निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या गो शाळेस चारा देण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले.

दिलदारसिंग बीर म्हणाले की, प्रतिष्ठानचे सर्व युवा सदस्य सामाजिक कार्यात योगदान देऊन गरजूंना आधार देत आहे. विविध धार्मिक कार्यक्रमासह वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. युवकांना दिशा देऊन समाजकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.