पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू ओम घनश्याम सानप याने सोलापूर येथे झालेल्या पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याची लातूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पुणे विभागाच्या संघामध्ये निवड झाली आहे.

ओम सानप हा श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरचा खेळाडू आहे. तो राष्ट्रीय प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे, आप्पा लाढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबचा सराव करत आहे. सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठ येथील क्रीड़ा शिक्षक श्री घन:श्याम सानप व चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका क्रांती सानप यांचा तो मुलगा आहे.
ना.ज. पाऊलबुद्धे ज्युनिअर कॉलेज मध्ये तो शिकत आहे. या यशाबद्दल मानधना चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन मानधना, प्राचार्य भरत बिडवे, क्रीडा शिक्षक महेंद्र थिटे, अहमदनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक होनाजी गोडाळकर, नंदेश शिंदे, अजित लोळगे, निलेश कुलकर्णी, अनंत रीसे, अमित जिंसिवाले आदींसह सर्व शिक्षकांनी सानप याचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.