बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन, आरोग्य शिबिर, लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी
विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने होणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, 11 ते 14 जानेवारी दरम्यान चार दिवसीय हा सोहळा रंगणार आहे. जय युवा अकॅडमी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, महानगरपालिका, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, समाजकार्य महाविद्यालय, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य आदींच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ॲड. महेश शिंदे व पोपट बनकर यांनी दिली.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय बचत गटांची उत्पादनांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, वस्तू विक्री प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, रक्तांचे विविध प्रकारच्या मोफत तपासण्या, नेत्र तपासणी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी शिबीर आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय युवा सप्ताह उद्घाटन, युवक मेळावा, मोफत कायदेविषयक शिबिर घेतले जाणार आहे.
या महोत्सवात लोपपावत चाललेल्या लोककलांचे सादरीकरण होणार असून, स्त्री जन्माचे स्वागत, 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींची मतदार नोंदणी अभियान, मोफत कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण व माहिती देणे या कार्यक्रमाचा समावेश आहे.
विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार 2024 वितरण केले जाणार आहे. सावित्री ज्योती महोत्सव यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे भीमराव उल्हारे, अनिल साळवे, स्वाती डोमकावळे, आरती शिंदे, अश्विनी वाघ, कावेरी कैदके, निकिता वाघचौरे, प्रीती औटी, डॉ. भास्कर रणनवरे, शाहीर कान्हू सुंबे, शेखर होले, विनायक नेवसे, निलेश रासकर, रावसाहेब मगर, सलीम सय्यद, डॉ. संतोष गिऱ्हे, वैशाली कुलकर्णी, डॉ. धनाजी बनसोडे, नैना बनकर, कांचन लद्दे, रोहिणी थोरात, मीना म्हसे, डॉ. धीरज ससाणे, सागर आलचेट्टी, अनंत द्रविड, डॉ. भगवान चौरे, विद्या तन्वर, रावसाहेब काळे, शरद वाघमारे, मार्गरेट जाधव, रजनी ताठे, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, दिनेश शिंदे, सुनील मतकर, ईसा शेख, गणेश बनकर, सचिन गुलदगड, जालिंदर बोरुडे, सुनील गायकवाड, शिवाजी नवले आदी प्रयत्नशील आहेत.
तर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक संजय गर्जे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे, जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत आहे.
कायदे विषयक शिबिरात ॲड. सुनिल तोडकर, ॲड. प्रशांत साळुंके, ॲड. विद्या शिंदे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. संतोष शिंदे, ॲड. दिलीपराज शिंदे, ॲड. शकील पठाण, ॲड. जबाजी खटके, ॲड. रघुनाथ बनकर, ॲड. बायजा गायकवाड, ॲड. गोरक्ष पालवे आदी मोफत कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9004722330, 9921810096 व 9657511869 वर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.