• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

पॉवरलिफ्टिंग राज्य चॅम्पियनशिप आणि डेडलिफ्ट स्पर्धेत रिया मिश्रा यांना दोन सुवर्ण

ByMirror

Dec 1, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग राज्य चॅम्पियनशिप आणि डेडलिफ्ट स्पर्धेत शहरातील रिया मिश्रा यांनी दोन सुवर्ण पदक पटकाविले. त्यांची ऊरण येथे होणाऱ्या इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन आयोजित 44 व्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली असून, महिलांच्या संघात त्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


मुंबई, विक्रोली येथे नुकतीच इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेने राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. रिया मिश्रा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन 63 किलो वजन गटात सब ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस मध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली.

नगरसेविका स्नेहल मोरे, हौशी पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष तुषार दरेकर व सचिव संतोष शिंदे यांच्या हस्ते त्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. रिया मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *