• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मारूती पवार यांचा सत्कार

ByMirror

Nov 3, 2023

राष्ट्रवादी सोशल मीडियाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी पवार यांच्या निवडीचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेश गोंडाल, मतीन शेख, देवेंद्र जाधव, राजू दहीहंडे, शिवम भंडारी, तुषार घाडगे, दिपक राहिंज, बबलू नांदे, पठाण मेंबर, किशोर शेलार, आकाश घोरपडे, संदीप कार्ले, सुभाष साळवे आदी उपस्थित होते.


महेश गोंडाल म्हणाले की, मारूती पवार हे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केले. सर्वसामान्यांना जोडलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, राजकीय, सामाजिक कार्य व युवकांमध्ये असलेला जनसंपर्काची दखल घेऊन त्यांची सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना मारुती पवार यांनी सर्व मित्र परिवाराचे सहकार्य मिळत असल्याचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *