• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शालेय सेपक टाकरा स्पर्धेत राळेगणच्या श्रीराम विद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व

ByMirror

Oct 13, 2023

25 व 26 रोजी सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा सेपक टाकरा असोशिएशनद्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय सेपक टाकरा स्पर्धेत 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक, 17 व 19 वर्षे वयोगटात मुलींनी द्वितीय तर 14 वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळवत जिल्हा स्पर्धेत वर्चस्व राखले.


अहमदनगर जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेतून मंगळवेढा, सोलापूर येथे होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी संघ जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या खेळाडूंना विजय जाधव व राजेंद्र कोतकर यांचे मार्गदर्शन लाभले.


सेपक टाकरा हा मलेशिया या देशाचा खेळ प्रकार असून, आशियाई क्रीडा प्रकारात हा खेळ समाविष्ट आहे. अतिशय अवघड असणाऱ्या खेळात श्रीराम विद्यालयाने मागील दहा वर्षात सातत्य टिकवीत राज्य राष्ट्रीय खेळाडू या खेळाडू घडवीले आहेत. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे उपाध्यक्ष रा.ह. दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्‍वस्त मुकेश दादा मुळे, मुख्याध्यापिका तारका भापकर, सरपंच दिपाली भापकर, उपसरपंच कल्पना कुलांगे, युवा नेते सुधीर पाटील भापकर, शरद कोतकर, भरत हराळ, सुभाष डावखरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किरण भापकर, सुनील खराडे, राजश्री जाधव, हरीभाऊ दरेकर, संजय भापकर, सुजय झेंडे, निळकंठ मुळे, विशाल शेलार, अरविंद कुमावत, बाळासाहेब कुताळ, रामदास साबळे, रिंकू शेलार आदींसह समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *