• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

राहुरी येथील अवैध वाळू उपशाला आशीर्वाद देणाऱ्या मॅडम व त्यांच्या कलेक्टरांची चौकशी करा

ByMirror

Aug 25, 2023

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाला आशीर्वाद देणाऱ्या मॅडम व त्याचे कलेक्शन करणाऱ्या दोघा जोडीदारांची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी व त्वरीत अवैध वाळ उपसा बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पंधरा दिवसा अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द, माहेगाव व प्रवरा येथे कोणत्या मॅडमच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरु आहे? त्याची चौकशी करुन हा प्रकार त्वरीत थांबविण्यात यावा. स्थानिक व्यक्तींच्या जोडीने मॅडमची वाळू तस्करांकडून वसुली सुरु केलेली आहे. मॅडम देखील दोन व्यक्तींच्या इशाऱ्यावर चालत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. टाकळीमियाचा तो व्यक्ती देखील वाळू कलेक्शन करत असून, या एजंटचे बँक अकाउंट तपासल्यास सर्व आर्थिक व्यवहार उघड होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मॅडमच्या इशाऱ्यावर वाळू तस्करांना पाठीशी घालून वसुली करणाऱ्या एजंटच्या जोडीवर कारवाई व्हावी, अधिकारी मॅडमलाच वाळू तस्करांनी खिशात घातल्याने वाळू माफिया राजरोसपणे दहशत निर्माण झाली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सदर प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर या प्रकरणी तक्रार केल्याने जीवितास धोका निर्माण झाल्यास याची जबाबदारी देखील वाळू माफिया, एजंट व अधिकारी मॅडमवर राहणार असल्याचे स्पष्ट करुन रोडे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *