• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंदवनात 1 हजार देशी व दुर्मिळ झाडांची लागवड

ByMirror

Aug 17, 2023

जय हिंद फाऊंडेशन व स्टेट बँक ऑफ इंडियाचा संयुक्त उपक्रम

माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेली वृक्ष लागवड क्रांती प्रेरणादायी -सरपंच राजेंद्र लवांडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांचे जिल्हाभर सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियानातंर्गत जय हिंद फाऊंडेशन व क्षेत्रीय प्रबंध कार्यालय अहमदनगर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने मांडवे (ता. पाथर्डी) येथील वन विभागाच्या 15 एकर मधील आनंदवनात 1 हजार झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षरोपण अभियानाच्या माध्यमातून देशी व दुर्मिळ झाडे लावण्यात आली.


वृक्षरोपण अभियानाप्रसंगी मांडवे गावचे सरपंच राजेंद्र लवांडे, चेअरमन रमेश लवांडे, संचालक राजेंद्र शिंदे, आनंद वनाचे संदीप राठोड, संगीताताई राठोड, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, शंकर बर्डे, रामकृष्ण काकडे आदी उपस्थित होते.


सरपंच राजेंद्र लवांडे म्हणाले की, देश रक्षणाच्या जबाबदारीनंतर माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेली वृक्ष लागवड क्रांती प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही देशाप्रती असलेले योगदान ते देत आहे. माजी सैनिकांच्या या कार्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.


शिवाजी पालवे म्हणाले की, जिल्हा हरित व सुंदर करण्यासाठी जय हिंदच्या माध्यमातून माजी सैनिकांचे हात पुढे सरसावले आहे. सैनिकांनी केलेला संकल्प सिध्दीस जात असतो. हा संकल्प देखील पूर्ण होणार आहे. पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भविष्यातील सुख-समृध्दीसाठी प्रत्येकाने वृक्षरोपण व संवर्धन मोहिमेत योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी करुन घेणार असल्याचे स्पष्ट केले. राजेंद्र शिंदे यांनी हिरवाई व दुर्मिळ वृक्षांनी नटलेल्या आनंदवनाची ख्याती राज्यभर पसरणार असल्याची भावना व्यक्त केली.


आनंद वनाचे संदीप राठोड यांनी पाच ते सहा वर्षात सातत्याने वृक्ष लागवडीचे कार्य करुन आतापर्यंत सात हजार दुर्मिळ झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचा जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *