• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गंधे यांचा सत्कार

ByMirror

Aug 16, 2023

सेवाभाव ह्रद्यात असल्यास निस्वार्थ सामाजिक कार्य घडते -विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिल गंधे यांना प्राईड ऑफ इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे यांनी त्यांचा सत्कार केला.


कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. गंधे यांना पुणे येथे ग्रीन वर्ल्ड ग्रुप व कॉसमॉस बँकेच्या वतीने प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. विजय भालसिंग म्हणाले की, कोरोना काळात डॉ. गंधे यांनी देवदूताप्रमाणे रुग्णांची सेवा केली. भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये त्यांनी 30 हजार पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात देखील त्यांनी सक्रीयपणे योगदान दिलेले आहे. सेवाभाव ह्रद्यात असल्यास निस्वार्थ सामाजिक कार्य घडते. सामाजिक संवेदना जागरुक ठेवून कार्य केल्यास समाजातील वंचितांना आधार मिळणार आहे. फक्त दिखाव्यापुरते केलेके समाजकार्य काही दिवसांनी समोर येते. डॉ. गंधे यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले समाजकार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. संतोष गिऱ्हे म्हणाले की, सामाजिक भावनेतून उभे राहिलेल्या समाजकार्यात सातत्य असते. डॉ. गंधे यांचे सामाजिक कार्य सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *