• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या काव्य संमेलनात आमदार लंके प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित

ByMirror

Aug 10, 2023

तर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र उदागे

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांची निवड करण्यात आली आहे.


डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी आमदार लंके व उदागे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सचिव सुनिल गोसावी, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, शिवाजी होळकर, पै. दादू चौगुले, आमदार लंके यांचे स्विय सहाय्यक शिवा कराळे आदी उपस्थित होते.
नवोदित कवी व नामवंत कवींचे काव्य संमेलन नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये रंगणार आहे. तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे शिक्षक व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर या सोहळ्यात कवींचा देखील सन्मान होणार असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *