• Thu. Oct 16th, 2025

भिंगार छावणी परिषदेच्या शाळेत राष्ट्रवादीच्या वतीने वृक्षरोपण

ByMirror

Jul 22, 2023

तर गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरचे वाटप

उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राला अजित पवारांचे सक्षम नेतृत्व लाभले -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी महाराष्ट्राला अजित पवारांचे सक्षम नेतृत्व लाभले. महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाने योगदान दिले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी नेहमीच वेगळी भूमिका घेऊन राज्याला विकासात्मक दिशा देण्याचे कार्य केले. सातत्याने वेगवेगळ्या निर्णयाने जनहित साधण्याचे काम ते करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


भिंगार छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण अभियान राबवून गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, साधना बोरुडे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, वकिल सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाणे, सरचिटणीस मारुती पवार, अमोल कांडेकर, डॉक्टर सेलचे डॉ. रणजीत सत्रे, संतोष हजारे, शिवम भंडारी, सोमनाथ शिंदे, निलेश इंगळे, लहू कराळे, शुभम पुंड, माजी प्राचार्य कैलास मोहिते, उमेश धोंडे, विशाल बेलपवार, राहुल जाधव, इंजि. औटी, सागर गुंजाळ आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


पुढे जगताप म्हणाले की, संपूर्ण राज्यात सामाजिक उपक्रमाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 2014 व 2019 या चुरशीच्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले ते आमदार असून, यावरून अजित पवार यांची लोकप्रियता लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भिंगारच्या ज्या शाळेतून अनेक स्वातंत्र्य सैनिक व अण्णा हजारे सारखे समाजसेवक घडले, अशा शाळेत राष्ट्रवादीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळेला लाभलेल्या ऐतिहासिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेने समाजाला दिशा देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी शाळेच्या इतिहासावर प्रकाश टाकून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. आभार माजी प्राचार्य कैलास मोहिते यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *