• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन

ByMirror

Jul 21, 2023

श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल व आर्मी पब्लिक स्कूलचा मुलींचा संघ अंतिम फेरीत

मुलांमध्ये आठरे पाटील स्कूल व आर्मी स्कूलचा संघ आघाडीवर

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. रिमझिम पावसात शुक्रवारी (दि.21 जुलै) मुलींचा फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. मुलींचे सामने नॉक आउट पध्दतीने खेळविण्यात आले. यामध्ये श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल व आर्मी पब्लिक स्कूलने अंतिम फेरी गाठली. तर मुलांच्या संघात आठरे पाटील स्कूल व आर्मी स्कूलच्या संघाने आघाडी घेतली आहे.


सकाळच्या सत्रात मुलांचे सामने झाले. 12 वर्ष वयोगटात डिवाईन ग्रेस विरुध्द ज्ञानसंपदा स्कूलमध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात ज्ञानसंपदा स्कूलने 6-0 गोलने विजय मिळवला. 14 वर्ष वयोगटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द तक्षीला स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात 6-1 गोलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट संघ विजयी ठरला. तर 16 वर्ष वयोगटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द तक्षीला स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात तक्षीला स्कूलने 4-1 ने विजय मिळवून झालेल्या पराभवाची परतफेड केली.


दुपारच्या सत्रात मुलींचे फुटबॉलचे सामने नॉक आउट पध्दतीने खेळविण्यात आले. यामध्ये सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द पोदार स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात पोदारने 2-0 गोलने विजय मिळवला. कर्नल परब विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट मधील सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंट संघ 1-0 गोलने विजयी ठरला. तर आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द पोदार स्कूल मध्ये सेमी फायनला सामना रंगला होता. यामध्ये आर्मी पब्लिक स्कूलने 3-0 गोलने विजय संपादन केले. त्याचप्रमाणे श्री साई इंग्लिश इग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यात झालेला सेमी फायनलच्या सामन्यात श्री साई इंग्लिश इग्लिश मिडीयम स्कूलने 1-0 गोलने विजय मिळवला. यामधील श्री साई इंग्लिश इग्लिश मिडीयम स्कूल व आर्मी पब्लिक स्कूल विजेत्या पदकासाठी अंतिम सामना खेळणार आहेत. मुलांचे नॉक आऊटचे सामने सात दिवसानंतर अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर पुन्हा रंगणार असून, यामधील विजेत्यांचे अंतिम सामने खेळविण्यात येणार आहे.


स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *