• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत ओएसिस, ज्ञानसंपदा, आयकॉन व आठरे पाटील स्कूलच्या संघाची बाजी

ByMirror

Jul 20, 2023

आजपासून रंगणार मुलींच्या फुटबॉलचे सामने

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (20 जुलै) झालेल्या फुटबॉलच्या सामन्यांमध्ये ओएसिस, ज्ञानसंपदा, आयकॉन व आठरे पाटील स्कूलच्या संघाने विजय संपादन केले. तर आज पासून मुलींचे फुटबॉलचे सामने रंगणार आहे. या स्पर्धेत 6 मुलींच्या शालेय संघांनी सहभाग नोंदवला असून, मुली आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करणार आहे.


सकाळच्या सत्रात 14 व 16 वर्ष वयोगटात ओएसिस स्कूल विरुध्द भाऊसाहेब फिरोदिया यांच्यात झाला. यामध्ये ओएसिस स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आक्रमक खेळी केली. यामध्ये ओएसिस स्कूलने 2-0 व 16-0 गोलने दणदणीत विजय मिळवला. तर 12 वर्ष वयोगटात श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द ज्ञानसंपदा स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात ज्ञानसंपदा स्कूलने 3-0 गोलने विजय पटकाविला.


दुपारच्या सत्रात 14 व 16 वर्ष वयोगटात अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यात आयकॉनने 2-0 गोलने विजय मिळवला. तर संध्याकाळी 14 व 16 वर्ष वयोगटात पोदार विरुध्द आठरे पाटील स्कूलचा सामना चांगलाच रंगला होता. यामध्ये आठरे पाटील स्कूलने आजही दमदार खेळी करुन आपले वर्चस्व कायम राखले. 14 वर्ष वयोगटात 0-13 तर 16 वर्ष वयोगटात 0-1 गोलने आठरे पाटील स्कूलने विजय मिळवला.


स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *