भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या वतीने
पालखीतील वारकर्यांच्या जेवणाची व्यवस्था
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानोबा माउली तुकाराम… चा गजर करीत शहरातील शहरातील मार्केटयार्ड येथे आगमन झालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागातील अहमदनगर भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनने मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले.
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे निघालेली ही दिंडीचे नुकतेच शहरात आगमन झाले असून, ही दिंडी दरवर्षीप्रमाणे मार्केटयार्डला दोन दिवसासाठी मुक्कामी होती. यावेळी ज्ञानोबा माउली तुकाराम, जयहरी विठ्ठल श्रीहरी विठ्ठल असा टाळ-मृदंगाच्या गजरात वारकर्यांचा भक्ती सोहळा मार्केटयार्डमध्ये भजन-किर्तनाने रंगला होता. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन प्रफुल्लीत झाला होता.

दिंडीतील सर्व वारकर्यांच्या जेवणाची सोय अहमदनगर भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. अन्नदानाचे नियोजन सर्व असोसिएशनच्या सभासदांच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते, दिलीप ठोकळ, महेंद्र लोढा, राम साठे यांनी वारकर्यांची जेवणाची व्यवस्था पाहिली. यावेळी सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.