जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी 7 मे रोजी पाथर्डी येथे पुरुष व महिलांसाठी खुल्या गटातील जिल्हास्तरीय मैदानी (अॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात सकाळी 8 वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 16 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुष व महिला खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांची पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये 21 ते 23 मे दरम्यान होणार्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. तर इतर स्पर्धकांना देखील सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी 8 वाजे पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑफलाईन अर्ज देखील भरता येणार आहे. भालाफेक व हातोडाच्या खेळाडूंनी आपला स्वतःचा भाला व हातोडा बरोबर घेऊन येण्याचे म्हंटले आहे.
राज्य स्पर्धेचे गुणवत्ता प्रमाणपत्र 5 टक्के नोकरीसाठी व जिल्हा सहभाग प्रमाणपत्र आर्मी भरतीसाठी उपयोग होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिनेश भालेराव, प्रा.विजय देशमुख, राहुल काळे, संदीप हारदे, रावसाहेब मोरकर, जगन गवांदे, श्रीरामसेतु आवारी, संदीप घावटे, अजित पवार, संभाजी ढेरे, राघवेंद्र धनलगड, किशोर मरकड प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9226238536, राहुल काळे 8830863116, संदीप हारदे 9657603732 यांना संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.