सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोलापूर येथे होणाऱ्या सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा खेळाडूंची अहिल्यानगर सब ज्युनिअर संघात निवड झाली आहे. यामध्ये ध्रुव गुगळे, आदिराज कोतकर, कृष्णा ठुबे, यश सोले, आर्यन वाघचौरे, तनिष्का बारहाते यांचा समावेश आहे.
दि.10 ते 15 सप्टेंबर दरम्यान सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन सब ज्युनिअर स्पर्धेला प्रारंभ झाले असून, या स्पर्धेमध्ये सदर खेळाडू अहिल्यानगर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूंना प्रशिक्षक छबुराव कोतकर व स्वाती बारहाते यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल सरस्वती विद्यालय मुख्याध्यापक संदीप भोर, प्राध्यापक प्रसाद जमदाडे, डॉ. देवेश कुमार बारहाते, पत्रकार विक्रम लोखंडे, संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
