कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर
नगर (प्रतिनिधी)- स्त्री सन्मान आणि लेकींच्या जन्माचे स्वागत करण्याचा संदेश देणाऱ्या स्त्री जन्माचे स्वागत या सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 57 विद्यार्थिनीचा सावित्रीची लेक पुरस्काराने गौरविण्यात आले.
2016 पासून सातत्याने राबविला जाणारा हा उपक्रम शहरात विद्यार्थिनींचा उज्वल भविष्य व सक्षमीकरणाचा आणि लेकींच्या स्वागताचा आदर्श ठरला आहे. गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भाजप प्रदेश महिला मोर्चा चिटणीस प्रा. गीता गिल्डा, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शेराल, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, भाजप शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे आदींसह विद्यार्थिनी व पालक सहित समाजातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल मोहिते म्हणाले की, सर्व समाजातील विद्यार्थिनींचा सन्मान होणे हा अभिमानाचा विषय आहे. स्त्री जन्माचे स्वागत हा उपक्रम केवळ विद्यार्थिनींना फक्त प्रोत्साहनासाठी नाही तर निकोप आणि प्रगतिशील देशाचे भविष्य याच विद्यार्थिनींमध्ये आहे एक नवा प्रगतशील समाज घडविण्यासाठी दिशादर्शक असे उपक्रम आवश्यक आहे. प्रा. सौ गीता स्त्री जीवनावर प्रकाश टाकला व भावनिक असे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्राचार्य सुनील सुसरे यांनी रात्र प्रशाला मध्ये शिकत असलेले विद्यार्थी प्रगती करत आहे. शिक्षण व आजचे युग या विषयावर मार्गदर्शन केले. विजयकुमार हनुमंत शेराल (संगमनेर) यांनी कवितेतून स्त्री शक्तीचा जागर केला. कल्पनाताई बुलबुले यांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
उपक्रमाचे अध्यक्ष नरेश कोटा म्हणाले की, समाजात स्त्रियांचा, विद्यार्थिनींचा सन्मान वाढविण्यासाठी आणि लेकींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज या माध्यमातून केवळ सन्मानच नव्हे तर आर्थिक प्रोत्साहनही दिले जात आहे, ज्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत असल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी 10 वी आणि 12 वीमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष वैभव कंदी, सागर महेसुनी, अक्षय कोंडा, विद्याताई एक्कलदेवी, श्रीमती सुनीताताई कंदी, नितीन एकलदेवी, मयूर श्रीगादी, ओंकार श्रीमल, सविता नरेश कोटा, विनायक नागुल, दिगंबर एक्कलदेवी, विशाल कोंडा, संदीप गाजुल, सुरज गाजुल, शुभम कोंडा, आदेश गेंट्याल, वंदनाताई दडगे, राहुल दुलम, तुषार गड्डम आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता प्रकाश कोटा यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव कंदी यांनी मानले.
