वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम
ज्ञानसाधना गुरुकुलने गुणवत्तेने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली -मनोज कोतकर
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कु. वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम आली. रेवती साबळे 94% गुण मिळवून द्वितीय तर सिद्धनीता डंबाळे 93% गुण मिळवून तृतीय आली.
तसेच अदिती कांडेकर 93%, कीर्ती बोरुडे 92%, सेजल शिंदे 91%, प्रसाद डमाळे 91%, गौरी शेळके 90%, मानसी वाबळे 90%, अचल धरम 88%, भाग्यश्री चेमटे 88%, वैष्णवी खंडागळे 87.40%, ओंकार बनकर 87%, तन्वी बनसोडे 86%, नेहाल गायकवाड 85.40%, हर्षदा दाते 85.20%, कल्याणी जाधव 85%, श्रुती टकले 85%, धीरज जांगीड 85%, यशराज पाटोळे 85%, आकांक्षा गंगावणे 85% गुण मिळवून यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा केडगाव ग्रामस्थ तसेच मनपा स्थायीचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनोज कोतकर म्हणाले की, ज्ञानसाधना गुरुकुलने 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून, या क्लासमधून नेहमीच चांगले गुण मिळवून विद्यार्थी बाहेर पडत असतात. मागील वर्षी सुद्धा 97% गुण मिळवणारी मुलगीच पहिली होती, तर याही वर्षी 97% गुण मिळवणारी मुलगीच पहिली आली आहे. त्यामुळे पालकांनी मुलींना चांगले शिक्षण द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी लेक वाचवा लेक शिकवा हा संदेश त्यांनी दिला. ज्ञानसाधना गुरुकुलच्या सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी पवार, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापक दत्तात्रय साकोरे, केडगाव स्पोर्टसचे छबूराव कोतकर, बच्चन कोतकर, संचालक भैरू कोतकर, उद्योजक सुमित लोंढे, आण्णा शिंदे, अजितदादा कोतकर, उद्योजक कुणाल चिपाडे, प्रवीण आव्हाड, शिवाजी मोढवे, बंटी वीरकर ज्ञानसाधनाचे संचालक प्रसाद जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार संदीप भोर यांनी मानले.