सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना सामाजिक कार्याबद्दल नवी दिल्ली येथे बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉक्टर बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठानच्या वतीने अंदानी यांना पद्मश्री जितेंद्रसिंग शनटी, भाजपचे राष्ट्रीय सचिव खासदर दुष्यंत गौतम, नवी दिल्लीचे पोलीस अधीक्षक तोमर, भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल राजीव भल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉक्टर बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठान ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था संपूर्ण देशात विविध क्रीडा स्पर्धा भरवित असते. क्रीडा, साहित्य, कला व सामाजिक क्षेत्रात या संस्थेचे कार्य सुरु आहे. दरवर्षी देशभरातील या क्षेत्रातील निवडक व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराच्या निवड समितीत असलेले भारतीय सैन्य दलातील अधिकारी व दिल्ली पोलीस मधील अधिकारी पुरस्कार्थींची निवड करत असतात. देशभरातून संस्थेला एक हजार ऑनलाईन प्रस्ताव आले होते. त्यामधून विविध क्षेत्रातील 40 व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अत्यंच मानाचा समजला जाणार बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक कार्याची दखल अंदानी यांना देण्यात आला आहे. अंदानी यांना यापूर्वी देखील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कर मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल आमदार अरुणकाका जगताप, आमदार निलेश लंके, खासदार सदाशिव लोखंडे, महापौर रोहिणी शेंडगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.