मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.
सकाळी मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन विधीवत पूजा करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश व विश्वस्तांच्या हस्ते महादेवाची आरती पार पडली.

यावेळी भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हर हर महादेवाच्या जय जयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेले. प्रसादाचे वाटप करुन या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.
