• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

सख्ख्या भावांनी केला महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

ByMirror

Jun 20, 2022

मोबाईलवर अश्‍लील मेसेज करुन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोघा सख्ख्या भावांनी परीक्षेला जाणार्‍या महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करुन तिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर युवतीच्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज केल्याप्रकरणी सोहेल शेख व सरफराज शेख (दोन्ही रा. गजराजनगर) यांच्या विरोधात पिडीत युवतीच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महाविद्यालयीन युवती परीक्षेला जात असतांना दोन्ही आरोपींनी पाठलाग करुन तिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याकडे युवतीने दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा आरोपींनी 15 जून रोजी युवतीच्या मोबाईलवर अश्‍लील मेसेज करुन, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या मनस्तापाला कंटाळून युवतीने फिनेल पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन शुध्दीवर आल्यानंतर सदर युवतीने आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *