राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धा
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेच्या दुसर्या दिवशी शनिवारी (दि.22 एप्रिल) सकाळच्या सत्रात विविध गटातील कुस्त्या रंगल्या होत्या.
गादी विभाग खुल्या गटातील कुस्ती पै. जयदीप पाटील विरुध्द पै. अभिषेक देवकर यांच्यात तसेच माती विभागातील 79 किलो वजन गटातील कुस्ती पै. पांडुरंग वाघमोडे (सोलापूर) विरुध्द पै. आकाश चव्हाण (अहमदनगर) यांच्यात जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे व उपमहाराष्ट्र केसरी पै. अनिल गुंजाळ यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी पै. श्याम लोंढे, शकिल शेख, कुस्ती संयोजन समितीचे वसंत लोढा, जिल्हा तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, पै. विलास चव्हाण, पै. महेश लोंढे आदी उपस्थित होते.
पै. जयदीप पाटील विरुध्द पै. अभिषेक देवकर यांच्यात रंगलेल्या कुस्तीमध्ये पै. जयदीप पाटील गुणांवर विजयी झाला. तर पै. पांडुरंग वाघमोडे (सोलापूर) विरुध्द पै. आकाश चव्हाण या कुस्तीत देखील पै. पांडुरंग वाघमोडे गुणांवर विजयी झाला.
