• Fri. Sep 19th, 2025

श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत

ByMirror

Jun 14, 2023

हातात टाळ व डोक्यावर पादुका घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते दिंडीत सहभागी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीमय वातावरणात जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले. शहरात पहिल्याच दिंडीचे आगमन झाले असताना वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित व भक्तीमय बनले होते.


भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी टाळ घेऊन जय हरी… विठ्ठलचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदवला. सर्वेश सपकाळ व अभिजीत सपकाळ यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या. दिंडीतील वारकर्‍यांनी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष केला. यावेळी प्राचार्य कैलासराव मोहिते, रमेश वराडे, अर्जुन बेरड, मच्छिंद्र बेरड, शिवम भंडारी, विलास तोडमल, सदाशिव मांढरे, अशोक पराते, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, बाळासाहेब बेरड, ईवान सपकाळ, मळूराज गाडेकर, बाळासाहेब राठोड, मतीन ठाकरे, असलम शेख, सिद्धूतात्या बेरड, कार्तिक बेरड, फैय्याज शेख, सचिन कस्तुरे, सुदाम मोरे, यशवंत शिंदे, सर्जेराव शेरकर, अय्याज शेख, प्रांजली सपकाळ, माधवी माळगे, संगीता सपकाळ, अनिता शेलार, पांडुरंग नागपुरे, सुदाम देवतरसे, मनसाराम रवेलिया आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


आनंदेवाडा श्रीक्षेत्र देवगिरी-दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे. दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. नगर-करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे.


सपकाळ परिवाराच्या वतीने पालखीतील पादुकांचे पूजन करण्यात आले. दिंडीचे प्रमुख ह.भ.प. मुरारी महाराज आनंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संजय सपकाळ म्हणाले की, या दिंडीचे भिंगार शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने स्वागत करण्यात येते. दिंडीला 113 वर्षाची परंपरा असून, शहरात सर्व प्रथम दाखल होणारी ही दिंडी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिंडीतील वारकर्‍यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *