नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
रक्तदान शिबिरात युवकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिरोमणी प्रतिष्ठान व कुंभार समाज सेवा समितीच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नालेगाव येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर समोर ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामूहिक पठन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी लाभ घेतला.

दक्षिणमुखी हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने झालेल्या हनुमान चालीसा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. या धार्मिक सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत गोरोबाकाका मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला असून, यामध्ये विजेत्या महिलेस पैठणीसह विविध बक्षीस देण्यात आली. या साप्ताहिक कार्यक्रमास शिवसेनेचे संभाजी कदम, नगरसेवक संतोष गेनप्पा, श्याम (आप्पा) नळकांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, अजय चितळे, बाबासाहेब सानप यांनी भेट देऊन संत गोरोबाकाका मंदिराचे दर्शन घेतले.
मंडळाचे अध्यक्ष जयकुमार सुसरे म्हणाले की, श्री संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथीला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. सर्व युवक एकत्र येऊन धार्मिक व सामाजिक सोहळ्यासाठी प्रयत्नशील असून, यामुढे देखील अशा पध्दतीने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर राजापुरे, दीपक राजापुरे, राहुल देवतरसे, संदीप सुसरे, राजेंद्र शिंदे, मोहन राजापुरे, संजय देवतरसे, दिलीप राजापुरे, राजू राजापुरे, अजय राजापुरे, गोरखनाथ राजापुरे, सागर राजापुरे, सागर देवतरसे, अजिंक्य देवतरसे, मयुरेश दळे, अभिजीत गोरे, अमित देवतरसे, सुधाकर देवतरसे, श्याम सुसरे, बाबासाहेब रोहोकले, आशिष सुसरे, अतुल देवतरसे,विनायक सुसरे, रामभाऊ सुसरे, रोहित देवतरसे, रुपेश मुकुटे, अमोल राजापुरे, नितीन राजापुरे, अक्षय राजापुरे, कचरू राजापुरे, अनिल राजापुरे, पृथ्वी सुसरे, आदित्य सुसरे, किरण कदम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.