• Wed. Oct 15th, 2025

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने

ByMirror

Jul 27, 2023

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास अन्नधान्य व किराणाची मदत

गरजूंना फुड पॅकेटसह फळांचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजू घटकांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास अन्नधान्य व किराणाची मदत देऊन गरजूंना जेवणाच्या पाकिटासह फळांचे वाटप करण्यात आले. वासन उद्योग समुहाचे स्व. कुंदनलालजी वासन यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, गुलशन कंत्रोड, सतीश गंभीर, डॉ. संजय असनानी, अनिश आहुजा, मनोज मदान, जतीन आहुजा, दलजीतसिंग वधवा, राजू जग्गी, सोमनाथ चिंतामणी आदींसह सेवादार उपस्थित होते.


जनक आहुजा म्हणाले की, जीवनात समाधानासाठी व्यवसायाला समाजसेवेची जोड असावी. वासन परिवार सामाजिक बांधिलकी व सचोटीने आपला व्यवसाय करत आहे. व्यवसायाबरोबर समाजातील गरजूंना त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला असून, ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. नाशिक येथे ट्रस्टच्या माध्यमातून मागील पाच वर्षापासून गरजूंसाठी अन्न छत्रालय अविरतपणे सुरु आहे. सेवाभाव या प्रमाणे वासन परिवार कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, लंगर सेवेला वासन परिवाराचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यापूर्वी देखील वासन परिवाराच्या माध्यमातून लंगर सेवेला अन्न-धान्याची मदत देण्यात आली होती. व्यवसायाला सामाजिक कार्याची जोड देऊन वासन ग्रुपचे सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *