• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शालार्थ वेतन प्रणाली तीन दिवसापासून पडली बंद

ByMirror

Dec 22, 2022

शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ सुरु करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

तांत्रिक कारणामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनांना विलंब होऊ नये -बाबासाहेब बोडखे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून बंद पडलेली शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ पूर्ववत सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचेकार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव व शिक्षण आयुक्तांना निवेदन पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.





तर तांत्रिक कारणामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनांना विलंब होऊ नये, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


शालार्थ वेतन प्रणाली सोमवार 19 डिसेंबर रोजी सायंकाळपासून बंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, खाजगी, प्राथमिक, अनुदानित शाळा, खाजगी माध्यमिक अनुदानित शाळा, खाजगी उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अदा करणे शक्य होणार नाही.

या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शालार्थ प्रणाली मार्फत अदा केले जातात. परंतु शालार्थ वेतन प्रणाली तीन दिवसापासून बंद असल्यामुळे राज्यातील कोणतेही वेतन बिले जनरेट होत नाहीत किंवा वेतन बिले काढता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


वेतन बिले तयार करून ती कोषागार सादर करणे, बिले मंजूर करून घेणे आणि बँकांमध्ये निधी जाणे यात काही कालावधी जात असतो. शालार्थ प्रणाली बंद असल्याने डिसेंबर महिन्याचे वेतन लांबणार आहे. यासाठी तात्काळ शालार्थ वेतन प्रणाली सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे व राज्य कार्यकारणी मंडळाचे पदाधिकारी पाठपुरावा करत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *