• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आर्थिक मदत

ByMirror

Jan 5, 2023

चार तासात प्रकरण मंजूर केल्याने रुग्णाचे नातेवाईक भारावले

पदाधिकार्‍यांना नातेवाईकांचे आभार पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे संपर्कप्रमुख रणजीत परदेशी, उपजिल्हाप्रमुख काका शेळके व शहर प्रमुख अनिकेत कराळे पाटील यांनी अवघ्या चार तासात आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली.

रुग्णाचे बंधू अनिल लवांडे यांनी पाठपुरावा करुन आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल या पदाधिकार्‍यांचे आभार माणून ऋण व्यक्त केले.


अनिल लवांडे यांचे मोठे बंधू कर्करोगाच्या दुर्धर आजाराने त्रस्त आहे. त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. खर्चिक शस्त्रक्रियेसाठी संबंधित पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णासाठी 1 लाख रुपयाचा निधी मंजूर करुन तो हॉस्पिटलला वर्ग केला.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकाला मदत करून न्याय दिल्याचे समाधान असल्याची भावना अनिकेत कराळे पाटील यांनी व्यक्त केली.


रुग्णाचे बंधू लवांडे यांनी अहमदनगर मधील शिवसेना वैद्यकीय काम अत्यंत प्रामाणिक व जलद गतीने करुन देत असल्याची प्रचिती आली. जनहितासाठी सुरु असलेले कार्य समाधान देणारे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *