• Wed. Oct 15th, 2025

राष्ट्रवादी युवकचे इंजि. केतन क्षीरसागर यांची शहरातील गुरुद्वाऱ्याला वॉटर कुलरची भेट

ByMirror

Jul 24, 2023

समाजाला व विकासाला चालना देण्याचे कार्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रेरणेने शहरातील भाई दयासिंहजी गुरुद्वारा गोविंदपुरा येथे वॉटर कुलरची भेट दिली. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वॉटर कुलर गुरुद्वाराचे विश्‍वस्त यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, उद्योग व व्यापार विभागाचे अनंत गारदे, विराज जाधव, शोभित खुराना, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, रोहित शर्मा, पप्पू नवलानी, मयूर टिंडवानी, केतन धवन, सुमित कुलकर्णी, अंजली आव्हाड, मंगेश शिंदे, आशुतोष पानमळकर, निहाल जाधव, रोहित सरना, ओंकार म्हसे, गौरव हरबा, संभाजी पवार, मयूर रोहकले, विशाल पवार, किशोर थोरात, अनिकेत दंडवानी आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, भाई दयासिंहजी शहरातील मोठा गुरुद्वारा आहे. येथे रविवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. तर जयंती उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम देखील सातत्याने सुरू असते. या धार्मिक कार्यक्रमासाठी गुरुद्वाऱ्यात येणाऱ्या भाविकांची सोय होण्यासाठी वॉटर कुलरची भेट देण्यात आली आहे. इंजि. केतन क्षीरसागर पक्षाच्या माध्यमातून युवकांचे प्रश्‍न सोडविण्यास सामाजिक कार्यात योगदान देत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजाला व विकासाला चालना देण्याचे कार्य अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरू आहे. त्याला जनतेची देखील साथ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून विविध प्रश्‍न हाताळले जात असताना समाजकारण या भावनेने देखील कार्य सुरू आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेने राष्ट्रवादीचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *