• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन शाळेत बाल आनंद व क्रीडा मेळावा उत्साहात

ByMirror

Dec 26, 2022

खाद्य पदार्थांचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांनी लुटला विविध खेळाचा आनंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात बाल आनंद व क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे विश्‍वस्त डॉ. आस्मा काझी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक समिउल्ला शेख, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एजाज शेख, जाविद पठाण, हिना शेख, आयेशा शेख, अर्शिया हवालदार, बाळासाहेब चौधरी, संतोष सुंबे, सुरेखा ससे, आसिया शेख, तब्बसुम शेख, अंजुम इनामदार, नर्गिस खान, तनाज शेख, इंगळे मॅडम, शब्बीर शेख, सईद शेख आदी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान व फास्टफुडपेक्षा घरगुती सकस आहार मिळण्याच्या उद्देशाने बाल आनंद मेळाव्यात विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते. खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी शालेय विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली होती. तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचा आनंद देखील विद्यार्थ्यांनी लुटला.


तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धेने झाली. विविध क्रीडा स्पर्धेचा थरार शाळेच्या मैदानात रंगला होता. आकाशात फुगे सोडून व मैदानाचे पूजन करुन वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन झाले. खो-खो, कबड्डी, धावणे, लांब उडी आदी विविध सांघिक व मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येने शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *