धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी धम्मरथाचा लोकार्पण
मानवतेच्या कल्याणासाठी धम्माचा प्रचार-प्रसाराचा उपक्रम दिशादर्शक -डॉ. पंकज जावळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातून शांती संदेश रॅली काढण्यात आली. तर भगवान गौतम बुध्दांना अभिवादन करुन धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी उभारण्यात आलेल्या धम्मरथाचा लोकार्पण करण्यात आला.
मार्केटयार्ड चौकातील भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शांती संदेश रॅलीला प्रारंभ झाले. प्रारंभी धम्मरथाचा लोकार्पण मनपाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते झाले. शांती संदेश रॅलीत संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे, भन्ते सचितबोधी, प्रज्ञाशील, अॅड. संतोष गायकवाड, संध्याताई मेढे, रोहित आव्हाड, संजय सकट, रंगनाथ माळवे, विशाल कांबळे, शिवाजी भोसले, अशोक बागुल, विजय भांबळ, विलास साठे, विजितकुमार ठोंबे, प्रमोद शिंदे, अकाश परदेशी, अशोक साळवे, सिंध्दात कांबळे, मिलिंद आंग्रे, प्रकाश कांबळे, जीवन कांबळे, सर्पमित्र आकाश जाधव, अविनाश भोसले, प्रविण चाबुकस्वार, शहराध्यक्ष राहुल कांबळे, राम गायकवाड, लक्ष्मण माघडे, माधव चाबुकस्वार, रवी कांबळे आदींसह श्रामणेर शिबिरातील उपासक उपासिका व मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, जनसामान्यांपर्यंत बुध्दांचा धम्म पोहचविण्यासाठी धम्मरथ प्रेरक ठरणार आहे. भगवान बुद्धांचे विचार जीवनाला प्रेरणा व दिशा देणारे असून, मानवतेच्या कल्याणासाठी धम्माचा प्रचार-प्रसाराचा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांनी भगवान बुध्दांनी प्रेम व अहिंसेचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार सर्व सजामासाठी दिशा देणारे असून, धम्माचे आचरण झाल्यास समाजातील द्वेष, अहिंसा नष्ट होवून समाजात सुख-शांती नांदणार असल्याचे स्पष्ट केले.
भन्ते सचितबोधी म्हणाले की, धम्मरथाच्या माध्यमातून गावोगावी धम्माचा प्रसार केला जाणार आहे. भगवान बुध्दांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. जीवन परिवर्तनासाठी धम्माचे विचार प्रफुल्लीत करणारे आहे. समता न्याय बंधुत्वाची शिकवण भगवान गौतम बुद्धांनी दिली. तो वारसा पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केला आणि हाच वारसा पुढे चालवण्याचे काम या धम्मरथाद्वारे होणार आहे. मानवतेच्या उद्धारासाठी धम्मविचार दिशादर्शक असून, यामध्ये मानव जातीचे कल्याण असल्याचे त्यांनी सांगितले.
शांती संदेश रॅलीत पांढरे पोषाख परिधान करुन महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर भन्तेजींसह बाल भिक्षुंचा सहभाग होता. श्रामणेर शिबिरातील उपासक-उपासिकांनी भगवान बुध्दांच्या विचारांचा यावेळी जागर केला. बुध्दं शरणम गच्छामि… संगीतमय ध्वनीत रॅलीचे शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण झाले. फुलांनी सजवलेले धम्मरथ रॅलीच्या अग्रभागी होते. तर दुसर्या वाहनावर भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याने सर्वांचे लक्ष वेधले. रॅलाचा समारोप नवीन टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झाला.
धम्म रथाच्या उभारणीला सुमारे 4 लाख 70 हजार रुपये खर्च आला असून, अजूनही काही काम बाकी आहे. या रथासाठी सुमारे 4 लाख 21 हजार रुपयाचे धम्मदान मिळाले. धम्मरथामध्ये समाजातील सर्व महापुरुषांचे छायाचित्रासह त्यांचे विचार मांडण्यात आले असून, भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीचा समावेश आहे. या धम्मरथासाठी विकास कांबळे, सतीश खैरे, जावळे परिवार, संजय कांबळे, राजू पंडित, चंद्रभान ठोंबे, उद्योजक अभय मिस्त्री, नगरसेवक राहुल कांबळे, दिलीप सातपुते, डॉ.पी.के. चौदंते, सुनिल कांबळे, पाखरे परिवार, कुमारसिंह वाकळे आदींसह दीडशेपेक्षा जास्त नागरिकांनी आर्थिक देणगी दिली आहे.