• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाबासाहेबांच्या जयंतीसाठी नागापूरच्या समाज मंदिराची स्वच्छता करुन अतिक्रमण हटविण्याची मागणी

ByMirror

Apr 13, 2023

प्रभाग अधिकारी यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी समाज मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी प्रभाग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


महापालिका हद्दीतील नागापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहे. या मंदिरात लाकडे व इतर टाकाऊ वस्तू टाकण्यात आलेले आहेत. तर परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


या समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार असून, या समाज मंदिर परिसरातील अतिक्रमण काढून स्वच्छता करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *