350 खेळाडूंचा सहभाग
पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रिक्ट अॅथलेटिक्स असोसिएशन व बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वरिष्ठ गटातील मैदानी स्पर्धा पाथर्डीत उत्साहात पार पडल्या. बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या मैदानी स्पर्धेत जिल्ह्यातील 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, श्री विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मेढे सर, संघटनेचे सचिव दिनेश भालेराव, क्रीडा संचालक प्रा. विजय देशमुख, रावसाहेब मोरकर, सचिन शिरसाठ, डोळे सर, पर्यवेक्षक संपत घारे, ज्ञानेश्वर गायके, किशोर मरकड आदींसह महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभय आव्हाड म्हणाले की, स्पर्धेच्या युगात खेळाला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाडू करिअरच्या दृष्टीने खेळाकडे पाहत असून, गरजू व गुणवंत खेळाडूंना दत्तक घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मैदानी स्पर्धेसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या खेळाडूंची 21 ते 23 मे दरम्यान पुणे येथे होणार्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयाकडून सर्व सहभागी खेळाडूंना नाश्ता व फळे वाटप करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राघवेंद्र धनलगडे, सुयोग शेळके, श्रीरामसेतू आवारी, रावसाहेब मोरकर, तुकाराम मरकड, गुलजार शेख, अमित चव्हाण, विश्वेषा मिस्कीन, नेहा मोरे महाविद्यालयाच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.