हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्तीत मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी शाही दमडी मशिद मध्ये सकाळी साडेनऊ वाजता रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली.
गावातील वाड्या वस्तीवरील मुस्लिम बांधव सामुदायिक नमाज पठणसाठी मशिद मध्ये एकत्र आले होते. मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशांमध्ये शांतता, समृद्धी व धार्मिक ऐक्यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.

मुस्लिम बांधवांना गावातील हिंदू बांधवांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देत एकमेकांना आलिंगन दिले. यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत होत. मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ग्रामस्थांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. यावेळी माजी उपसरपंच फारुक सय्यद, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच सुधाकर कदम, जालिंदर शिंदे, गुलाब सय्यद, आय्युब सय्यद, सत्तार सय्यद, बाबूलाल सय्यद, बादशाह सय्यद, उमर सय्यद, जावेद सय्यद, कय्यूम सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, हुसेन सय्यद, युनूस सय्यद, मुक्तार सय्यद, वाजिद सय्यद, प्रा. भाऊसाहेब पुंड, सुरेश कदम, सलीम सय्यद, जमीर सय्यद, रफिक सय्यद, उस्मान शेख, आसिफ शेख, अन्सार सय्यद आदींसह हिंदू-मुस्लिम बांधव व नाले हैदर यंग पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमजान ईद शांतते पार पाडावी यासाठी पी.एस.आय. रणजीत मारग, पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले, पोलीस पाटील अरुण होले, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.